HW Marathi
देश / विदेश

#MahatmaGandhi :  देशभरात आजपासून प्लास्टिक बंदी

मुंबई। महात्मा गांधी जयंती निमित्ताने आजपासून (२ऑक्टोबर) एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकवर (सिंगल यूज प्लास्टीक) बंदी घालण्यात आली आहे. त्यात थर्माकोलच्या वस्तू, प्लास्टिकचे वापर असलेले कप आणि अन्य वस्तूंचाही समावेश आहे. याशिवाय ५१ मायक्रॉनवरील पिशव्यांवरही ही बंदी घालण्यात आली आहे. परंतु प्लास्टिकच्या बाटल्यांना यातून वगळण्यात आले आहे. प्लास्टिक पर्यावरणासाठी धोकादायक आहे. तरीही याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे कळते. त्यानंतर सरकारकडून प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे.

सरकारी निर्णयानुसार बुधवारपासून एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नव्या नियमानुसार दुधाच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारी ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिक पिशवीवर पुनर्खरेदी किंमत व उत्पादकाचे नाव असणे गरजेचे आहे. तसेच प्लास्टिक, थर्माकोलवर पुनर्खरेदी किंमत व उत्पादकाचे नाव असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाड व दोन ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे सीलबंद प्लॉस्टिक पॅकेजिंगचे आवरण असल्यास, त्यावर पुनर्खरेदी किंमत व उत्पादकाचे नाव प्रसिद्ध करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

 प्लास्टिकच्या वापरावर बंदी

प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर सजावटीसाठी करता येणार नाही. थर्माकोल (पॉलिस्टायरिन) आणि प्लॉस्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल वस्तू म्हणजे ताट, कप्स्, प्लेट्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे इत्यादी वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच हॉटेल्समध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारी प्लॉस्टीकची भांडी, वाट्या, स्ट्रॉ.सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या), २०० मिलीपेक्षा कमी द्रव धारण क्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पीईटी व पीईटीई बाटल्या, पिण्याच्या पाण्याच्या पिशव्या.

 प्लॉस्टिकवर बंदी नाही

प्लॉस्टिकचा एक थर असलेला पुठ्ठा किंवा खोका, विशेष आर्थिक क्षेत्र, निर्यातीसाठी विविक्षित उद्योग इत्यादीमध्ये फक्त निर्यातीसाठी वापरले जाणारे प्लास्टीक आवरणाचे उत्पादन. मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचे व २० टक्के पुनर्चक्रित प्लास्टीकपासून बनविलेले प्लॅस्टिक थर्माकोलचे आवरण, पुनर्चक्रण होणारे मल्टिलेअर पॅकेजिंग म्हणजेचिप्स पॅकेट, शॅम्पू सॅशे, तेल पॅकेट, चॉकलेट पॅकेट इत्यादी, घरगुती वापराची प्लास्टीक उत्पादने, औषधांचे वेष्टन, वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय उत्पादनांसाठी वापरण्यात येणारे प्लॉस्टिकवर बंदी नाही.

  प्लास्टिक वापर केल्यास अशी होईल कारवाई

प्लास्टिक व थर्माकोलबंदी अंतर्गत पहिला गुन्हा नोंद झाल्यास ५ हजार रुपये, दुसरा गुन्हा नोंद झाल्यास १० हजार रुपये तर तिसऱ्यांदा गुन्हा नोंद झाल्यास २५ हजार रुपये आणि ३ महिने कारावास अशी दंडात्मक कारवाई केली जाईल.

Related posts

त्रालमध्ये चकमक, सुरक्षा दलाच्या जवानांनी २-३ दहशतवाद्यांना घेरले

News Desk

मुंबई विमानतळाने रचला नवा विक्रम, २४ तासांत १००७ विमानांची उड्डाणे

News Desk

डोकलामचा विषय शांततेत सुटला त्यातच समाधान- लियु फांग

News Desk