नवी दिल्ली | आमची लढाई ही दहशतवादाविरोधात आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानी भूमीमध्ये जोपर्यंत दहशतवादी तळ निर्माण होत राहील तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर कारवाई करत राहू, असा इशारा भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने मंगळावारी (२६ फेब्रुवारी) पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राइक करून दहशतवादी तळावर बॉम्ब हल्ला करून मोठी कारवाई केली होती. यानंतर पाकिस्तानने बुधवारी (२७ फेब्रुवारी) भारतील लष्कर तळावर बॉम्ब हल्ला करण्याच प्रयत्न केला.
Major General Surendra Singh Mahal: As long as Pakistan continues to harbour terrorists, we will continue to target the terror camps pic.twitter.com/IOl8768FxU
— ANI (@ANI) February 28, 2019
वायुसेना, भूदल आणि नौदल या तिन्ही सेना दलांची पहिल्यांदाच संयुक्त पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेमध्ये एअर व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर, भारतीय लष्कराचे मेजर जनरल सुरेंद्र सिंग महल आणि भारतीय नौदलाचे रिअर अॅडमिरल डी. एस. गुजराल यांनी पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईचे पुरावेच सादर केले.
Visuals of cover of AARAM missile fired from Pakistani F-16 aircraft found near the LoC in India pic.twitter.com/qHdOm5cDqN
— ANI (@ANI) February 28, 2019
या पत्रकार परिषदेत पाकिस्तानने वेळोवेळी मारलेल्या कोलांटउड्या तसेच भारतीय हवाई दलाकडून देण्यात आलेले सडेतोड प्रत्युत्तर याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. भारताकडून पाडण्यात आलेल्या पाकिस्तानच्या एफ-१६ लढाऊ विमानाचे पुरावे या पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला.
Air Vice Marshal RGK Kapoor to question by ANI on bombing on JeM terror camps in Balakot: Premature to say number of casualties on the camp, whatever we intended to destroy we got that result pic.twitter.com/lYzggEwGge
— ANI (@ANI) February 28, 2019
पाकिस्तानचे एफ-१६ लढाऊ विमान ‘अम्राम मिसाईल’चे तुकडे सादर करण्यात आले. हे तुकडे भारतात एलओसीजवळ सापडले होते. बालाकोटमध्ये केलेल्या कारवाईचे पुरावे आपल्या हाती असून पुरावे सादर कधी करायचे हे सरकार ठरवेल, असे तिन्ही दलांनी स्पष्ट केले आहे.
Air Vice MArshal RGK Kapoor: There is enough evidence to show that F-16s were used in this mission through their electronic signatures. Parts of AMRAAM, air to air missile which is carried only on the Pakistani F-16s was recovered east of Rajouri within the Indian territory. pic.twitter.com/edtvXYnNbK
— ANI (@ANI) February 28, 2019
वायुसेनेचे व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर म्हणाले की, विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला. काल (२८ फेब्रुवारी) भारतील लष्कर तळावर बॉम्ब हल्ला करण्याच प्रयत्न केला. परंतु पाकिस्तानच्या बॉम्ब हल्ल्याने भारताचे काही नुकसान झाले नाही.
WATCH: Joint press briefing by the Army, Navy and the Air Force in New Delhi https://t.co/SooRKNi5T1
— ANI (@ANI) February 28, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.