नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ मार्च) संपूर्ण देशाला संबोधित केले आहे. अंतराळात भारताने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर आता चौथ्या स्थानी भारताचा तिरंगा फडकविला आहे. भारतीय शास्त्रज्ञांना अंतराळातील ३०० किमी अंतरावरील लक्ष्य भेदण्यात यश आले आहे. ‘अंतरिक्ष महाशक्ती’ म्हणून भारताचा उदय झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना म्हटले आहे. मोदींने डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. भारताकडून अँटी सॅटेलाईट (ए-सॅट) मिसाईल यांची चाचणी यशस्वी मोदी म्हणाले.
#MissionShakti is special for 2 reasons:
(1) India is only the 4th country to acquire such a specialised & modern capability.
(2) Entire effort is indigenous.
India stands tall as a space power!
It will make India stronger, even more secure and will further peace and harmony.
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) March 27, 2019
लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय ?
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १६० किमी ते २००० किमी अंतरापर्यंत कक्षा म्हणजे लो अर्थ ऑर्बिट होय. १६० किमीपासून २००० किमी अंतरापर्यंतच्या या कक्षेतच सर्वाधिक संख्येने उपग्रह आहेत. या कक्षेत नकाशे, खनिजांचे मापन, लोकसंख्या, जंगल, शेती यांचे मापन आणि नियोजन करणाऱ्या उपग्रहांची दाटी आहे. विज्ञानासाठी वापरले जाणारे सर्व उपग्रह देखील याच कक्षेत फिरत असतात.
PM Narendra Modi: India has entered its name as an elite space power. An anti-satellite weapon A-SAT, successfully targeted a live satellite on a low earth orbit. pic.twitter.com/VSJANo4Jt7
— ANI (@ANI) March 27, 2019
PM Narendra Modi: 'Mission Shakti' operation was a difficult target to achieve which was completed successfully within three minutes of launch. pic.twitter.com/u3nY3OTdjJ
— ANI (@ANI) March 27, 2019
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
- अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारताचा चौथ्या स्थानी झेंडा फडकविला आहे
- भारताने आज (२७ मार्च) अंतरिक्ष महाशक्ती बनला आहे
-
मिशन शक्तीअंतर्गत क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उपग्रह पाडण्यात यश, या अभियानाच्या यशस्वीतेमुळे भारत अंतराळात महाशक्ती बनला आहे.
- भारताने मिसाईलच्या द्वारे एक उपग्रह पाडण्यात यश आले
- भारताने फक्त ३ मिनिटांत उपग्रह पाडला
- डीआरडीओच्या शास्त्रज्ञांकडून लक्ष साध्य करण्यात यश आले
- ३०० किमी अंतरावरील लक्ष्य भेदण्यात यश
- भारताकडून अँटी सॅटेलाईट (ए-सॅट) मिसाईल यांची चाचणी यशस्वी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.