पश्चिम बंगाल | पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. अवघ्या २४ तासांत पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा विरूद्ध ममता दीदी हा चुरशीचा सामना सुरू झाला आहे. भाजपने सुवेंदु अधिकारी यांना ममता दीदींविरोधात उभं केलं असलं, तरी ममता दीदींनी त्यांचा सामना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशीच असल्याप्रमाणे प्रचार सुरू ठेवला आहे. शुक्रवारी झालेल्या प्रचारसभेमध्ये त्यांनी थेट मोदींवर निशाणा साधताना त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.
“इथे उद्योगविश्वाचा विकास थांबला आहे, फक्त त्यांची (पंतप्रधान नरेंद्र मोदी) दाढी वाढते आहे. कधी ते स्वत:ला स्वामी विवेकानंद म्हणवून घेतात, तर कधी स्टेडियमला स्वत:चं नाव देतात. त्यांच्या डोक्यात काहीतरी बिघाड झाला आहे. त्यांचा स्क्रू ढिला झालाय असं वाटतंय”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. एएनआयनं यासंदर्भात माहिती दिली आहे. ममता दीदी विरुद्ध सुवेंदू अधिकारी सामना!२७ मार्च म्हणजेच शनिवारी पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.
तर २९ एप्रिल रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत असून २ मे रोजी निकाल जाहीर होतील. खुद्द ममता बॅनर्जी नंदीग्राममधून निवडणूक लढवणार असून त्यांच्या विरोधात त्यांचेच एकेकाळचे विश्वासू सहकारी आणि सध्या भाजपामध्ये सामील झालेले सुवेंदु अधिकारी यांना भाजपाने नंदीग्राममधून उभं केलं आहे. दरम्यान, ममता दीदींच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात भाजपाला उमेदवार सापडला असला, तरी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अद्याप भाजपाला ठरवता आलेला नाही.
#WATCH | Industrial growth has stopped. Only his (PM Narendra Modi's) beard is growing. Sometimes he calls himself Swami Vivekananda & sometimes renames stadiums after his own name. Something is wrong with his brain. It seems his screw is loose: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/3zn0v5BRXM
— ANI (@ANI) March 26, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.