HW News Marathi
Covid-19

जगात कोरोनाची लस घेणाऱ्या पहिल्या पुरुषाचा झाला मृत्यू

लंडन | कोरोना जगभरात पसरायला २०१९ मध्ये सुरवात झाली. डिसेंबर २०२० मध्ये कोरोनावरील लस उपलब्ध झाली होती. फायझर-बायोटेकची सर्वात प्रथम लस ८१ वर्षीय विल्यम शेक्सपियर यांनी घेतली होती. त्यांचे आज निधन झाले. जगातील कोरोना लसीचा पहिला डोस घेणारे ते पहिले व्यक्ती ठरले होते. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे त्यांच्या कुंटुबियांनी म्हटलं आहे. सर्वांनी लस घेणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांच्या कुंटुबियांनी म्हटलं आहे.

डिसेंबर 2020 मध्ये शेक्सपियर यांनी कोव्हेंट्री रुग्णालयात फायझर ही कोरोनाची पहिली लस घेतली होती. त्यांनी लस घेण्याच्या काही मिनिटांपूर्वी मार्गारेट केनेन या ९१ वर्षीय महिलेने कोरोनाचा डोस घेतला होता. त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या होत्या. विल्यम यांचे निधन स्ट्रोकमुळे झाले असल्याचे यूनिवर्सिटी हॅास्पिटलने म्हटलं आहे. विल्यम यांच्या मागे पत्नी जॅाय, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे.

बीबीसीने दिलेल्या या वृत्तानुसार, सर्वांनी लस घेणे हीच शेक्सपियर यांना खरी श्रद्धांजली असेल. त्यामुळे सर्वांनी करोना प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने करण्यात आले आहे. शेक्सपियर यांनी जवळपास तीन दशके समाजसेवा केली आहे.

रोल्स रॉयसचे माजी कर्मचारी आणि तेथील रहिवासी काउन्सिलर असणाऱ्या शेक्सपियर यांचे दीर्घ आजारामुळे युनिव्हर्सिटी हॉस्पिटल कॉव्हेंट्री याठिकाणीच निधन झाले, अशी माहिती डेली मेलने दिली आहे. याच ठिकाणी त्यांनी लस घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

News Desk

‘श्रीमंत लोक आयसीयू बेड्स अडवतात’ राजेश टोपेंचा धक्कादायक खुलासा…

News Desk

बीडच्या केजमधील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा आज औरंगाबादेत मृत्यू

News Desk