HW News Marathi
Covid-19

दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदावरून मनोज तिवारींची उचलबांगडी, तर आदेश गुप्तांची नियुक्ती

मुंबई | दिल्लीचे खासदार आणि अभिनेता मनोज तिवारी यांना दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. मनोज तिवारी यांच्या जागी आदेश गुप्ता यांची वर्णी लागली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या पराभवामुळे मनोज तिवारी यांची भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी हटवण्याचे आदेश दिल्याच्या चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

तसेच मनोज तिवारींना दिल्ली प्रदेशाध्यपदाबरोबरच दिल्ली भाजप अध्यक्ष पदावरूनही हटविले आहे. आता दिल्ली भाजप अध्यक्षपदी छत्तीसगडचे अध्यक्ष विष्णुदेव साय यांची निवड करण्यात आली आहे. मनोज तिवारी हे दिल्लचे नसल्यामुळे स्थानिक नेत्यांचा विरोध होता. तर दुसऱ्या बाजुला आदेश गुप्ता यांचे व्यापाऱ्यांमध्ये चांगले संबंध आहेत. भाजप मूळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदेश गुप्ता यांचे नाव घोषित करण्यात आले. गुप्ता एमसीडीमध्ये महापौर राहीले आहेत.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्यांना फासावर लटकवू, दिल्ली उच्च न्यायालयाने भरला दम

News Desk

फेसबुक आणि रिलायन्सचा हा करार टेक क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवूक

News Desk

राज्यात मे महिन्यामध्ये १० हजारांहून अधिक उमेदवारांना रोजगार ! नवाब मलिक

News Desk