HW Marathi
देश / विदेश

मसूद अजहरची फ्रान्समधील सर्व संपत्‍ती होणार जप्त

नवी दिल्ली | पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आता फ्रान्सला मोठा दणका दिला आहे. मसूद अजहरची फ्रान्समधील सर्व संपत्‍ती जप्त करण्याचा निर्णय फ्रान्स सरकारने घेतला आहे. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्रसंघाकडे प्रस्ताव मांडला होता. परंतु, या प्रस्तावाविरोधात चीनने नकाराधिकाराचा (व्हिटो) वापर केल्याने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने हा प्रस्ताव फेटाळाला.

“मसूद अजहरचे नाव यूरोपियन यूनियनच्या दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्‍नशील आहोत. जैश-ए-मोहम्मद आणि मसूद अझहर याचा परस्परांशी काहीच संबंध नसल्याचा दावा करत चीनने नकाराधिकाराचा (व्हेटो) वापर केल्याने मसुदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा मार्ग अडचणीचा झाला. आता फ्रान्स सरकारने अजहरची संपत्‍ती जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे फ्रान्स सरकारने म्हटले आहे.

Related posts

बस दरीत कोसळून 30 ठार

News Desk

शिमल्यात विक्रमी ७४ टक्के मतदान

News Desk

कोर्टाच्या आदेशाची सरकारने चुकीची व्याख्या केली | सुप्रीम कोर्ट

अपर्णा गोतपागर