HW Marathi
देश / विदेश

‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी नाही, चीनमुळे युनोने प्रस्ताव फेटाळला

नवी दिल्ली । पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड जैश-ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला काल (१३ मार्च) आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने फेटाळला आहे. अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाकडे अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स या तिन्ही देशांनी मांडला होता. परंतु या प्रस्तावाविरोधात चीनने  नकाराधिकाराचा (व्हेटो) वापर केल्याने संयुक्त राष्ट्राच्या सुरभा समितीने हा प्रस्ताव फेटाळाला आहे.

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होती. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतासोबत फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेने २७ फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर मत मांडण्यास समितीने काही दिवसांची मुदत दिली होती.

परिषदेची ही मुदत काल (१३ मार्च) दुपारी ३ वाजता संपणार होती. परंतु मुदत संपण्यास अवघा काही शिल्लक असतानाच चीनने नकाराधिकाराचा (व्हेटो) वापर करीत मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या निर्णयावर हरकत नोंदवली. पुढे चीने व्हिटोच वापर करत या संघटनेसंदर्भात अजून माहिती मागणी केली आणि या प्रस्तवाविरोधात मतदान केले. यामुळे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीने फ्रान्सचा प्रस्ताव नाकारला आणि मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास नकार दिला.

 

Related posts

अमेरिकेत विमान अपघात, 16 ठार

News Desk

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

News Desk

पाकला आता भारतीय टोमॅटोही झोंबले

News Desk