HW News Marathi
देश / विदेश

मौलाना मुफ्ती यांना केले होम क्वॉरंटाईन, तब्लिगी जमातीच्या कार्यक्रमात लावली होती हजेरी

दिल्ली | दिल्लीतील निजामुद्दीन भागात तब्लिगी जमातीच्या कार्यक्रमात देशातील अनेक ठिकाणांहून लोकं गेली होती. दरम्यान, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर काही जणांना क्वॉरंटाऊन करण्यात आले आहे तर काही जणांच्या चाचण्या सुरु आहेत. या कार्यक्रमात मालेगावातूनही अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते. महत्त्वाची बाब म्हणजे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्तीही या कार्यक्रमाला गेले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामूळे खबरदारी लक्षात घेत पालिका प्रशासनाने त्यांना कालपासून (१एप्रिल) होम क्वॉरंटाईन केल्याची माहिती उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

या कार्यक्रमामूळे निजामुद्दीन हे कोरोनाचे प्रसार केंद्र होण्याची भीती वर्तवली जात आहे. तसेच, या कार्यक्रमात मौलाना मुफ्ती यांच्यासह अजून ७ जण सहभागी झाल्याची माहिती पालिका प्रशासनाला जिल्हा प्रशासनाकडून मिळाली. तसेच, आणखी १ व्यक्ती उत्तरप्रदेश येथील फैजाबाद येथील असल्याची माहितीही प्रशासनाला मिळाली आहे. या व्यक्तीव्यतिरिक्त आणखी ६ जणांना शोध पोलिस प्रशासन घेत आहे. एकीकडे कोरोनाच्या पार्श्भूमीवर देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली जात असतानाच दुसरीकडे आमदार मुफ्तीच अशा कार्यक्रमांना उपस्थित राहील्याने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी मुफ्ती यांच्यावर आरोप होताच आणि आता या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवत त्यांच्यावर पोलिस प्रशासन काय कारवाई करणार असा प्रश्न उभा राहीला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हनीप्रीत-राम-रहीम जेलमध्ये येणार एकत्र ?

News Desk

काँग्रेसची स्वबळाची घोषणा, महाराष्ट्रासाठी राहुल गांधींचा ठरला ‘मास्टर प्लॅन’

News Desk

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी प्रविण दरेकर यांची निवड

News Desk