HW News Marathi
देश / विदेश

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग अधिक कठीण

नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांचा चुना लावून हिरा व्यापारी मेहुल चोक्सी परदेशात फरार झाले आहेत. भारत सरकार चोक्सीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत होती. परंतु अँटिग्वाच्या पंतप्रधान कार्यालयाने चोक्सीला भारतात पाठविण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे चोक्सीच्या प्रत्यर्पणाचे सर्व दारवाजे बंद झालेली आहेत.

अँटिग्वाच्या पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी लियोनेल हर्स्ट एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते. त्यावेळी ते म्हणाले की, “मेहुल चोक्सी आता अँटिग्वाचा नागिरक आहे आणि अँटिग्वा सरकार त्याची नागरिकता हिरावू शकत नाही. तसेच भारत सरकारचे कोणतेही अधिकारी आमच्या देशात मेहुल चोक्सीला घेण्यासाठी आले असल्याची माहिती अद्याप आम्हाला मिळालेली नाही.”

तसेच माध्यमांच्या रिपोर्टनुसार मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता यांना भारतात आणण्यासाठी सीबीआय आणि ईडीचे काही अधिकारी अँटिग्वाला जाणार होते. त्यानंतर या दोघांना भारतात आणण्यासाठी भारताकडून एअर इंडियाचे बोईंग विमान देखील पाठविण्यात आले होते. या संदर्भात लियोनेल हर्स्ट बोलताना सांगितले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

योगी आदित्यनाथ अयोध्येतून विधानसभा निवडणूक लढणार ? चर्चेला उधाण

Aprna

राजीव गांधी सामूहिक हत्याकांडाचे जनक, भाजपचे दिल्लीच्या चौकात पोस्टर्स

swarit

सरकारने उचललेले पाऊल पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक असेल | मनमोहन सिंग

News Desk