HW Marathi
देश / विदेश

राजनाथ सिंहांनी केली राफेलची पूजा, भारतीय वायू दलाच्या ताफ्यात

नवी दिल्ली | विजयादशमी आणि वायूसेना दिवसाच्या मुहूर्तावर पहिले राफेल हे लढाऊ विमान भारताच्या ताफ्यात सामील झाले आहे. यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह फ्रान्सला पोहोचले असून यावेळी राजनाथ सिंह यांच्याकडून राफेल विमानाची पूजा करण्यात आली. त्याचबरोबरफ्रान्सच्या  मेरिनेक हवाईतळावर राजनाथ सिंह राफेल विमानातून उड्डाण देखील केले.

फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर हवाईदलप्रमुख राफेल हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. यावेळी हवाईदलप्रमुख हरजीत सिंह अरोरा उपस्थित होते. आज भारतात सर्वत्र विजयादशमी साजरी होत आहे. यात अपप्रवृत्तींचा विनाश करून सत्यप्रवृत्तीचा विजयोत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे. योगायोग म्हणजेच आजच वायुसेना दिनही आहे. अशा या शुभदिनी राफेल भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात येत असून हवाईदल यामुळे अधिक शक्तिशाली होणार आहे, असा विश्वास राजनाथ यांनी व्यक्त केला.

राफेल हे लढाऊ विमान दसॉल्ट  एव्हिएशन नावाच्या एका फ्रान्सच्या कंपनीने तयार केले आहे. यात मिटिऑर आणि स्काल्प ही दोन क्षेपणास्त्र आहेत, ज्यामुळे ते भारताला हवेतून हवेत मारा करण्याची अद्भुत क्षमता देईल. ही दोन्ही क्षेपणास्त्र राफेलचा यूएसपी आहे, असे म्हणता येईल.

३६ राफेल विमाने भारताला मिळणार

भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये सप्टेंबर २०१६ मध्ये राफेल विमान करार झाला होता. त्यानुसार ५९ हजार कोटी रुपये मोजून भारताला ३६ राफेल विमान मिळणार आहेत. यापैकी पहिले राफेल विमान आज भारताकडे सोपवण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात पुढच्यावर्षी मे महिन्यात आणखी राफेल विमाने भारताला मिळणार  आहे.

राफेल लढाऊ विमानाची महत्तावाची वैशिष्ट्ये

राफेल असे लढाऊ विमान आहे की, हे विमान एका मिनिटात ६० हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकते. या लढाऊ विमानात इंधन क्षमता १७ हजार किलो आहे. राफेल विमान खराब हवामानात एकाच वेळी अनेक कामे करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखले जाते. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. राफेलची मारक क्षमता ३७०० किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज ३०० किलोमीटर आहे. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे. राफेल विमान २४,५०० किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकते आणि ६० तासांचे अतिरिक्त उड्डाणही करु शकते. राफेल विमानाचा वेग २,२२३ किलोमीटर प्रति तास आहे.

 

Related posts

एनआयएने इसिसच्या १० संशयितांना अटक करून घातपाताचा कट उधळला

News Desk

शहरात नेमके किती खड्डे | सर्वोच्च न्यायालय

News Desk

नीरव मोदीला लवकरच अटक होण्याची शक्यता

अपर्णा गोतपागर