अमेरिका | कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. जगातील २०० पेक्षा जास्त देशामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देश कोरोनावरील लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असून मृतांचाही आकडा मोठा आहे. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनवर मोठा आरोप केला आहे. कोरोनावरील संशोधनातील बौद्धीक संपदा आणि कोरोनाच्या संशोधनातील डेटा चोरत असल्याचा आरोप त्यांनी चीनवर केला आहे.
ज्या संस्था कोरोनाशी निगडीत संशोधन करत आहेत, त्यांना चीनमधील सरकारशी निगडीत कॉम्प्युटर हॅकर्सद्वारे लक्ष्य केले जाऊ शकते असा दावाही एफबीआय आणि होमलँड सिक्युरिटी विभागाद्वारे करण्यात आला होता. त्यांच्या या दाव्यानंतर लगेचच पॉम्पिओ यांनी चीनवर कोविड १९ च्या संशोधनाचा डेटा चोरत असल्याचा आरोप केला आहे.
चीनशी संबंधित असलेल्या सायबर हॅकर्सने केलेल्या प्रयत्नांचा अमेरिका निषेध करत आणि या सर्व कारवाया थांबवल्या पाहिजेत असे आवाहनही केले आहे. “चीन असा देश आहे ज्या ठिकाणी या वायरसची उत्पत्ती झाली आणि त्यांच्यामुळेच जगभरात हा व्हायरस पसरला. चीनने कोरोना वायरसशी निगडीत माहिती जगाला देण्यास मनाई केली. त्यामुळेच आज मोठी समस्या निर्माण झाली आहे,” असेही पॉम्पिओ यांनी म्हटले आहे.
Instead PRC-affiliated actors are trying to steal COVID-related research from the United States. We condemn these attempts and call on the PRC to cease this malicious activity. https://t.co/q2jTm4xrpJ
— Secretary Pompeo (@SecPompeo) May 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.