HW News Marathi
देश / विदेश

बीएसएफचे दहा जवान बेपत्ता

मुगलसराय | पश्चिम बंगालमधील मुशीर्दीबाद मधून जम्मूला जाणारे बीएसएफचे दहा जवान बेपत्ता झाले आहेत. हे जवान ८३ व्या बटालियनमध्ये तैनात होते. हे सर्व जण लष्कराच्या स्पेशल ट्रेनिंगमधून बाहेर पडले होते. जम्मू-काश्मीरला जात असताना वर्धमान आणि धनबाद रेल्वे स्थानकादरम्यान हे जवान बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील जीआरपीमध्ये जवान बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

धनबाद रेल्वे स्थानकावरून रेल्वे निघाल्यानंतर बीएसफचे एसआय सुखबीर सिंह यांनी जवानांची मोजणी केल्यानंतर दहा जवान गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात आल्या. रेल्वे वर्धमान आणि धनबाद स्टेशन दरम्यान रेल्वे थांबल्यानंतर जवान गायब झाले असावे, अशी सुखबीर सिंह यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना अटक

News Desk

पीएनबीच्या घोटाळ्यातील आरोपींना अटक

News Desk

केजरीवालांनी महिलांच्या सुरक्षेसाठी मेट्रो आणि बसमध्ये प्रवास केला मोफत

News Desk
देश / विदेश

हवामान बदलामुळे पहिल्याच दिवशी अमरनाथ यात्रेला ब्रेक

News Desk

जम्मू कश्मीर | हवामानात झालेल्या बदलामुळे अमरनाथ यात्रेच्या पहिल्याच दिवशी लोकांना प्रवासा दरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. प्रचंड पाऊस पडल्यामुळे काही जागी जमीन खचली आहे. त्यामुळे भक्तांचा प्रवास काही वेळासाठी थांबविण्यात आलेला आहे. सध्या हे प्रवासी भक्त बालटाल व पहलगाम येथे थांबले आहेत. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार कालच जम्मू कश्मीर मध्ये हवामान बदलामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये येत्या ३-४ दिवसांपर्यंत प्रचंड पावसाची शक्यता दर्शविण्यात आली आहे. श्राइन बोर्डाच्या एका अधिका-यांने दिलेल्या माहितीनुसार पाऊस आणि हवामान बदलामुळे अद्याप ही यात्रा सुरु करण्यात आलेले नाही.

संबंधित अधिका-यांने बोलताना स्पष्ट केले आहे की जोपर्यंत हवामान ठिक होत नाही आणि बाबा बर्फानी पर्यंत पोहचण्यासाठी रास्ते ठीक होत नाहीत तोपर्यंत हि यात्रेसाठी भक्त पुढे जाऊ शकत नाही. जम्मू मधून काल सकाळी निघालेल्या भक्तांच्या पहिल्या ग्रुपमध्ये जवळपास २९९५ भाविकांचा समावेश आहे. तसेच जम्मूमधून सुमारे ३४०० भक्त आज बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी रवाना झाले होते. परंतु प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात हवामान ठिक नसल्यामुळे बेस कॅम्पमध्ये तीर्थयात्रेसाठी गर्दी होत आहे. यावेळी भक्तांच्या सुरक्षेसाठी विषेश काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी प्रवासाच्या वेळी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यात रेडिओ फ्रिक्वेंसी चिप आणि वाहनावर विशेष मोटरसायकल स्क्वॉड तयार करण्यात आले आहे.

 

 

Related posts

बुलढाण्यात आणखी १ पॉझिटिव्ह, जिल्ह्यात आता एकूण ४ ‘कोरोना’बाधित

News Desk

वरिष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना अपोलो रुग्णालयात हलविले

News Desk

भारतीय हवाई दलाचे MiG-29K लढाऊ विमान गोव्यात कोसळले

Aprna