HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान मोदींसोबत जम्मू काश्मीरवर सर्वपक्षीय बैठक, मेहबूबा मुफ्ती दिल्लीत दाखल

नवी दिल्ली | आज (२४ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणानंतर जम्मू- काश्मीरवर सर्वपक्षीय बैठक होणार आहे. काल (२३ जून) पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती दिल्लीत पोहोचल्या. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह केंद्रशासित प्रदेशातही हाय स्पीड इंटरनेट सेवा बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जम्मू – काश्मीरमध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पीडीपी जम्मू-काश्मीरमध्ये तयार झालेल्या पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेश युतीचा एक भाग आहे. ज्याची मंगळवारी बैठक झाली आणि त्यानंतर पंतप्रधानांशी सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.

५ ऑगस्ट, २०१९ ला केंद्र सरकारनं जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हटवल्यानंतर पहिल्यांदाच अशी बैठक बोलावण्यात आली आहे. ज्यात पंतप्रधान काश्मीरच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी बोलणार आहेत. केंद्र सरकारबरोबर झालेल्या या बैठकीत ८ राजकीय पक्षांच्या १४ नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अलट बिहारी वाजपेयी यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु

News Desk

शरजीलच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या उर्वशी चुडावालाचा जामीन अर्ज फेटाळला

News Desk

डीएसकेंना 22 फेब्रुवारीपर्यंत दिलासा

Adil