HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकारकडून मुंबई लोकलसाठी तब्बल ५४ हजार कोटींचा निधी मंजूर

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळाने मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या मुंबई लोकलसाठी तब्बल ५४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा खर्च विभागून घेणार आहेत. आगामी निवडणुकांच्या तोंडावर केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आलेला हा निर्णय देशाच्या आर्थिक राजधानीसाठी लाभदायक ठरणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने एमयूटीपी फेज ३ ए अंतर्गत येणाऱ्या रेल्वे मार्गांचा विस्तार आणि आधुनिकीकरण या कामांसाठी ५४,७७७ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला होता. रेल्वे मंत्रालयाच्या या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून ५१ लाखांची मदत जाहीर

News Desk

महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब पाठोपाठ दिल्लीही ‘लॉकडाऊन’ 

swarit

धक्कादायक ! तेलंगणामध्ये महिला पोलिसाला जबर मारहाण

News Desk