HW News Marathi
देश / विदेश

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करदिलासा मिळण्याचे संकेत

मंदीला रोखण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करणारे केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पात करदात्यांना सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे. कंपनी कर कमी केल्यानंतर आयकर कपातीची मागणी जोर धरत असून सरकारने आयकर कमी करण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. त्याशिवाय सध्याच्या कर संरचनेत बदल करून अधिक उत्पन्न असणाऱ्या वेतनधारकांसाठी नवा कर स्तर जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. केंद्रात अर्थसंकल्प तयारीला सुरुवात झाली आहे. मागील अर्थसंकल्पात आयकरात कोणताही बदल झाला नव्हता. त्यामुळे यंदा कर कपातीची दाट शक्यता आहे. सध्याचा कर स्तर बदलल्यास केवळ तीन कोटी करदात्यांना फायदा होईल.

एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली. वैयक्तिक करदात्यांना मिळणाऱ्या या संभाव्य लाभाव्यतिरिक्त शेअर बाजारातील व्यवहारांना लागू असलेला दीर्घकालीन भांडवली नफा करदेखील (एलटीसीजी) कमी करण्याची योजना सरकारकडून आखली जात असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडून हे निर्णय घेतले जातील, असे समजते.

कर संरचनेचा आढावा घेणाऱ्या समितीने १० लाखांचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांसाठी सरसकट १० टक्के आयकराची शिफारस केली आहे. १० ते २० लाखांचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्यासाठी २० टक्के आणि २० लाख ते २ कोटी दरम्यान वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांसाठी ३० टक्के, वार्षिक उत्पन्न २ कोटींहून अधिक असणाऱ्या करदात्यांसाठी ३५ टक्के कर असावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांनी केले राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठाच्या इमारतीचे राष्ट्रार्पण!

News Desk

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती! – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Manasi Devkar

अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk