HW News Marathi
देश / विदेश

मोदींचा राहुल गांधींना फोन करुन तब्येतीची विचारपूस

बंगळुरू | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कर्नाटक दौऱ्यात हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. राहुल गांधी यांच्या विरोधात कट असल्याचे काँग्रेसकडून सांगून या घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. गांधींनी कर्नाटक पोलीसात तक्रार करण्यात केली आहे. या घटने संदर्भात कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती काँग्रेसकडून मिळाली आहे. मोदी हे सध्या दोन दिवसाच्या चीन दौऱ्यावर आहेत.

राहुल गांधी हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शुक्रवारी दिल्लीहून हुबळीसाठी रवाना होत होते. १० सीटर दसॉल्ट फॉक्न २००० हे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हेलिकॉप्टर एका बाजूला झुकले आणि खाली आले. त्याच वेळी हेलिकॉप्टरमध्ये विचित्र आवाज येऊ लागला.

  • वैमानिकाविरुद्ध गुन्हा

काँग्रेस पक्षाकडून गुरुवारी कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे संबंधित वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी सदर हेलिकॉप्टर ताब्यात घेऊन वैमानिकाची चौकशीही सुरु केली असल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ICICI च्या चंदा कोचर आणि व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत गोत्यात

News Desk

देशभरात आजही इंधन दरात घट, पेट्रोल ८२.९४ तर ,डिझेल ७५.६४ रुपये

swarit

सलमानला जामीन मिळणार का?

News Desk