HW News Marathi
देश / विदेश

संपूर्ण जगात फक्त गेल्या २४ तासांत आढळले ३० हजारांहूनही अधिक कोरोनाबाधित

मुंबई | चीनमधील वुहान शहरामध्ये सर्व प्रथम वाढलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत जगातील तब्बल १७७ देशांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असल्याची माहिती मिळत आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा हा आकडा तासागणिक वाढतच चालल्याने सर्वच देशांसाठी हा अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे गेल्या केवळ २४ तासात संपूर्ण जगातून ३० हजारांहूनही अधिक कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल १३५४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे विशेषतः इटलीमध्ये मोठी भीषण स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंपैकी तब्बल ६२७ मृत्यू हे एकट्या इटली देशात झाले आहेत.

भारतातही बघता बघता कोरोना बाधितांचा आकडा २७६ वर जाऊन पोहोचला आहे. तर राज्यातही २४ तासांच्या आतच कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा ५२ वरून थेट ६३ इतका झाला आहे. काहीच तासांत राज्यात झालेली रुग्णांची ही वाढ निश्चितच चिंताजनक आहे. राज्यातील या ११ नव्या रुग्णांपैकी १० जण मुंबईतील तर १ जण पुण्याचा आहे. आपण सध्या फेज २ मध्येच असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितले आहे. एकीकडे देशात अशी स्थिती असताना जगात आतापर्यंत जवळपास पावणे तीन लाखांहूनही अधिक जण कोरोनाबाधित आहेत. तसेच ११, ३८५ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर ७,००० रुग्णांची स्थिती गंभीर आहे. जगभरात निर्माण झालेल्या या भीषण स्थितीत एक दिलासादायक बाब म्हणजे ९२,००० कोरोनाचे रुग्ण हे बरे झाले आहेत.

 

देश मृत्यू एकूण रुग्ण

चीन 3,255 81,000

इटली 4,032 47,021

स्पेन 1,093 21,510

इराण 1,433 19,644

फ्रान्स 450 12,612

अमेरिका 258 19,640

इंग्लंड 177 3,983

दक्षिण कोरिया 102 8,799

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेबांना अपेक्षित महाराष्ट्र घडवणं, संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकारणं हीच खरी आदरांजली !

News Desk

२०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘अजेय भाजप’चा नारा

swarit

धक्कादायक ! राफेल कराराची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला, महाधिवक्त्यांची माहिती

News Desk