नवी दिल्ली | आसामच्या डिब्रुगढमध्ये आज (२५ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात जास्त लांबीच्या ‘बोगीबील रेल्वे-रोड’ पुलाचे उदघाटन करण्यात येणार आहे. या पुलाची लांबी ४.९४ किमी एवढी आहे. या पुलामुळे डिब्रुगढपासून अरुणाचल प्रदेशच्या धेमाजीपर्यंतचे अंतर तब्बल ७०० किमीने घटणार असून १८० किमी एवढे होणार आहे.
बोगीबील पुलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा डबलडेकर पूल आहे. या पुलावर ट्रेन आणि बस या दोघांचीही वाहतूक होऊ शकणार आहे. या पुलाला जवळपास ४८५७ कोटी इतका खर्च आला आहे. नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेचे सीपीआर प्रणव ज्योती शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ब्रम्हपुत्र नदीवर पूल बांधणे मोठे कठीण काम होते. या भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे हे भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने येथे भूकंपाचा देखील धोका आहे.”
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी १९९७ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. यानंतर २००२ रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात या पुलाचे काम सुरु करण्यात आले होते. तर आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बोगीबील पुलाचे लोकार्पण होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.