वायनाड | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या केरळ दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींनी त्यांच्या वायनाड मतदारसंघातील मतदारांचे आभार मानण्यासाठी वायनाडला पोहचले. यावेळी राहुल यांनी सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदीवर तोड डागली. “नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी देशात द्वेषाचे विष पेरण्याचे काम केले आहे. मला माहिती आहे की, मी खूप मोठा शब्दचा वापर करत आहे. परंतु हे सत्य आहे की, मिस्टर नरेंद्र मोदींनी देशात द्वेषाचे विष पसरवून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला,” असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे.
Congress President Rahul Gandhi in Kalpetta, Wayanad: He represents the worst sentiments of this country. He represents anger, he represents hatred, he represents insecurity and he represents lies. #Kerala https://t.co/UGhYhOENSr
— ANI (@ANI) June 8, 2019
”नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात वाईट भावनेचे प्रतिनितित्व करतात. ते राग, द्वेष, भीती आणि खोटेपणाचे बोलतात,” अशा शब्दात राहुल गांधी यांनी टीका केली. यावेळी सर्वसामान्यांसाठी आपले दरवाजे नेहमीच उघडे असतील, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. केरळमधील वायनाडमध्ये राहुल गांधी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. या विजयानंतर राहुल गांधी प्रथमच आपल्या नव्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.