कोलकाता | विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवणाऱ्या तृणमूल काँग्रेसनं भाजपला धक्का दिला आहे. दरम्यान, ४ वर्षांपूर्वी तृणमूलची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले दिग्गज नेते मुकूल रॉय यांनी आज (११ जून) घरवापसी केली आहे. थोड्या वेळापूर्वी तृणमूल भवनमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पजली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या उपस्थित रॉय यांनी घरवापसी केली आहे. भाजपच्या गळाला लागलेल्या सर्वात मोठ्या नेत्याने घरवापसी केल्याने भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, मूकूल रॉय यांच्यासोबत त्यांचे पुत्र सुभ्रांशू रॉय यांनीही वापसी केली आहे.
BJP national vice president Mukul Roy and his son Subhranshu Roy join TMC in the presence of West Bengal CM Mamata Banerjee, in Kolkata. pic.twitter.com/WS9oFE2J79
— ANI (@ANI) June 11, 2021
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलला मोठी गळती लागली. तृणमूल सत्ता गमावणार असं वाटू लागल्यानं अनेक आमदारांनी पक्षाला रामराम करत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. भाजपमध्ये झालेल्या इनकमिंगमागे मुकूल रॉय यांचा हात होता. मात्र आता मुकूल रॉयच माघारी फिरत असल्यानं त्यांच्या गटातले बरेचसे आमदार पुन्हा तृणमूलमध्ये परतू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत बंगालमध्ये भाजपला बरेच धक्के बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश निवडणूकीच्या तोंडावर कॉंग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.