HW News Marathi
देश / विदेश

बाप्पाच्या सजावटीसाठी मुंबईतील मखर अबु धाबीला

मुंबई । अवघ्या काही दिवसांवरच गणेशोत्सव हा सण येऊ ठेपला आहे. सगळीकडेच लाडक्या गणपती बाप्पासाठीची सजावट करण्यासाठी लगबग पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून लोकांचा कल इको फ्रेंडली गणपतीची मूर्तीला जास्त पसंती मिळताना दिसू येत आहे. त्यातच आता बाप्पासाठी इको फ्रेंडली मखर ही सध्या चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध कलाकार नानासाहेब शेंडकर यांनी थर्माकॉल पासून बनविण्यात येणारे मखर बंद करून २००१ साली सर्वांसाठी पुठ्ठ्यांचे मखर हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ज्यात चक्क कागदापासून ते अगदी सुंदर आणि टिकणारे मखर बनवून देतात. नानासाहेब यांनी २००१ साली ‘उत्सवी’ ही संस्था स्थापन केली. ही संस्था गेल्या १८ वर्षांपासून पर्यावरणपूरक कागदी पुठ्ठ्यांचे फोल्डिंग मखर तयार करत असून त्याचा प्रचार व प्रसार करीत आहेत. नानासाहेब शेंडकर यांचे कागदी पुठ्ठ्यांचे फोल्डिंग मखर यावर्षी परदेशी जाणार आहे.

मुंबईतील प्रसिद्ध मखर कलाकार नानासाहेब शेंडकर यांचे कागदी पुठ्ठ्यांचे फोल्डिंग मखर यावर्षी परदेशी जाणार आहे. महाराष्ट्र मंडळ अबु धाबी या परदेशी मंडळाने यंदा लालबाग मधील नानासाहेबांनी बनविलेल्या कागदी पुठ्याचे मखर गणेशउत्सवासाठी अबु धाबीला नेणार आहे. त्यासाठी खास प्रकाश पाटील अबू धाबीवरून मुंबईला आले होते. यावेळी त्यांनी सिद्धिविनायक पॅलेस हे खास आकर्षण ठेवले आहे. यावेळी ते म्हणाले, अबु धाबीमध्ये गेली. २५ वर्ष गणेशउत्सव साजर केला जात आहे. आणि यंदाचे २६ वे वर्ष आहे. दीड दिवसाचा गणपती आम्ही बसवितो. आणि गेली २५ वर्ष आम्ही थर्माकॉलचे डेकोरेशन करत होतो. पण मंडळाच्या कार्यकारी समितीने असे ठरवले की यावर्षी इकोफ्रेंडली सजावट करावी म्हणून सिद्धिविनायक पॅलेस आणि जयपूर पॅलेस असे संयुक्त मखर बनवून घेतले आहे.

तसेच मूर्ती देखील शाडूची असते, संपूर्ण उत्सव हा इकोफ्रेंडली पद्धतीने आम्ही साजरी करणार आहोत. दीड दिवसात कमीत कमी दहा ते पंधरा हजार भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे यंदा अबु धाबीमध्ये सिद्धिविनायक पॅलेस हे खास आकर्षण परदेशी भाविकांना पाहायला मिळणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#DelhiResults : दिल्ली निवडणुकीच्या निकालाला मी जबाबदार !

swarit

तिहेरी तलाकवर कायदा करणार मोदींचे स्वातंत्र्यदिनी आश्वासन

News Desk

व्याजदर ‘जैसे थे’, 9.5 टक्के विकास दराचा अंदाज, RBI चे आर्थिक धोरण जाहीर

News Desk