मुंबई | जेट एरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गोयल यांच्या मुंबईतील निवासस्थानी काल (४ मार्च) रात्री उशिरा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. गोयल यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ईडीने गोयल यांना समन्स पाठविला होता. गोयलांनी कर वाचवण्यासाठी देशातील आणि परदेशातील कपंन्यांशी पैशाची देवाण-घेवाण केली होती.
Mumbai: Enforcement Directorate (ED) raid is underway at the residence of former Chairman of Jet Airways, Naresh Goyal in connection with an alleged money laundering case. pic.twitter.com/0rFmo9B3Th
— ANI (@ANI) March 5, 2020
जेट एअरवेज आणि गोयल यांची ‘फेमा’अंतर्गत चौकशी सुरू आहे आणि त्यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा ईडीचा विचार आहे. जेटच्या १२ वर्षांपासूनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी ईडीकडून सुरू आहे. ईडीने आतापर्यंत गोयल यांनी अनेकवेळा चौकशी केली आहे.
यापूर्वी गोयल आणि त्यांची पत्नी अनिता यांच्यावर नुकतीच एका ट्रॅव्हल कंपनीत ४६ कोटी रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोलय यांच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी)नुसार विविध कलमांतर्गत त्यांच्या गुन्हा दाखल केला आहे. आता दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट भागात असलेल्या कार्यालयात अकबर ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य वित्त अधिकारी राजेंद्रन नेरुपरंबिल यांनी तक्रार दिली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.