HW News Marathi
देश / विदेश

बंद लिफाफ्यातून सुचविली जाणार नव्या काँग्रेस अध्यक्षपदासाठीची नावे

नवी दिल्ली | काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेसच्या सर्व महासचिवांना काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी बंद लिफाफ्यात चार-चार नावे देण्याच्या सूचना दिल्या आहेत. महासचिवांकडून नावे देण्यात आल्यानंतर त्याबाबत काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या सदस्यांची मते देखील घेतली जातील. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत गांधी परिवारातील कुणीही व्यक्ती सहभागी होणार नसल्याची माहिती मिळत आहे. लोकसभेत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि आता काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार ? याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या.

नव्या काँग्रेस अध्यक्षासाठी पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे देखील चर्चेत आली. मात्र, आता या नव्या पद्धतीने काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार असल्याची माहिती मिळत आहे. पक्षातील अनेक महासचिवांनी नावे पाठवायला सुरुवात देखील केली आहे. सर्व महासचिवांकडून नावे प्राप्त झाल्यानंतर जास्त जणांनी सुचविण्यात आलेल्या एक नाव निवडण्यात येईल. त्या नावावर काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांची बैठक होईल. या चर्चेनंतर काँग्रेस अध्यक्षपदाबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्या लोकांना न्याय मिळेल !

News Desk

स्मृती इराणींने हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या पार्थिवाला दिला खांदा

News Desk

दिल्लीत राष्ट्रपती भवनापर्यंत कॉंग्रेसचा मार्च, शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी कॉंग्रेस आक्रमक

News Desk