HW News Marathi
देश / विदेश

लस येत नाही तोवर आपल्याला कोरोनाशी युद्ध सुरुच ठेवायचं आहे

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांना संबोधित केले होते. यावेळी त्यांनी कोरोनाचे संकट अजून गेले नाही असे सांगितले.लस येत नाही तोवर आपल्याला कोरोनाशी युद्ध सुरुच ठेवायचं आहे. करोनाची लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यासाठीही सरकारची पूर्ण तयारी सुरु आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहचावी यासाठी सरकारची तयारी झाली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

कोरोनाविरोधातली लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र या सगळ्यात कोणीही निष्काळजीपणा केला तर त्यामुळे आपल्या आनंदावर विरजण पडू शकतं. सावधगिरी बाळगून सगळे व्यवहार करा असंही त्यांनी स्पष्ट केलं. काही जण मास्क न घालता फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होत आहे.

कोरोनाच्या संकटाशी आपण चांगली लढाई दिली आहे. सणवारांचे दिवस आहेत, बाजारात काहीशी चमक दिसू लागली आहे. मात्र लॉकडाउन संपला असला तरीही व्हायरस गेलेला नाही हे विसरु नका. भारताने आपली स्थिती सावरली आहे ती आपल्याला आणखी उंचवायची आहे. आता हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. आपल्यापेक्षा अमेरिका आणि ब्राझिल यांची स्थिती वाईट आहे. हळूहळू सगळेच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत.

आज आपल्या देशात कोरोना रुग्णांनासाठी ९० लाखांपेक्षा जास्त बेड्स उपलब्ध आहेत. १२ हजार क्वारंटाइन सेंटर्स आहेत. देशातल्या चाचण्यांची संख्या १० कोटींचा टप्पा ओलांडेल. करोनाविरोधात लढताना जास्तीत जास्त चाचण्या करणं ही आपली ताकद आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिझर्व्ह बँकेच्या ‘डिजिटल रुपी’ या डिजिटल चलनाची घोषणा

News Desk

‘भाईयो और बहनो’, म्हणत राहुल गांधींनी केली पंतप्रधानांची नक्कल

Darrell Miranda

हरसिमरत कौर माझ्याकडे पाहून हसल्या | राहुल गांधी

News Desk