नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले की, “जो बायडन यांच्याशी माझं आज बोलणं झालं. त्यांच्या यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. आम्ही प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. हवामान बदलांवर सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही सहमती दर्शविली आहे.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष आणि मी इंडो-पॅसिफिक प्रदेशात आणि त्यापलीकडे शांतता, सुरक्षा या दृष्टीने रणनिती करत भागीदारी बळकट करण्यास उत्सुक आहोत. जो बायडन यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो बायडन यांच्याशी पहिले संभाषण केले आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून जो बायडन यांचं शपथ घेतल्यानंतर अभिनंदन केलं होतं.
President @JoeBiden and I are committed to a rules-based international order. We look forward to consolidating our strategic partnership to further peace and security in the Indo-Pacific region and beyond. @POTUS
— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2021
पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, भारत-अमेरिका संबंधांना नवीन उंचीवर नेण्यासाठी अध्यक्ष जो बायडन यांच्याबरोबर काम करण्यास मी वचनबद्ध आहे. सामान्य आव्हानांना तोंड देण्यासाठी आम्ही एकत्र उभे आहोत. भारत-अमेरिका संबंध सामायिक मूल्यांवर आधारित आहेत. दोन्ही देशांमध्ये बहुपक्षीय द्विपक्षीय अजेंडा, वाढते आर्थिक संबंध आणि लोकांमधील मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.