नवी दिल्ली | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. तसंच उपराष्ट्राध्यक्ष निवड झाल्याबद्दल भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनाही मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. बायडन-हॅरीस प्रशासनासह भारत-अमेरिका संबंध नवीन उंची गाठतील, अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेच्या ४६ व्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन हे निवडून आलेत. पंतप्रधान मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. ‘भव्य विजयाबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भारत-अमेरिका संबंधांसाठी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्ही यापूर्वी दिलेलं योगदान कौतुकास्पद होतं. आता तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाल्याने भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर काम करण्यात आनंद होईल’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
Congratulations @JoeBiden on your spectacular victory! As the VP, your contribution to strengthening Indo-US relations was critical and invaluable. I look forward to working closely together once again to take India-US relations to greater heights. pic.twitter.com/yAOCEcs9bN
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2020
पंतप्रधान मोदींनी आणखी एक ट्विट केलं. उपराष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांचं अभिनंदन केले. ‘तुमचं यश प्रेरणादायक आहे. हा केवळ आपल्या नातलगांसाठीच नव्हे तर सर्व भारतीय-अमेरिकेच्या जनतेसाठी अभिमानाचा क्षण आहे. मला आशा आहे की भारत-अमेरिका संबंध तुमच्या नेतृत्वात आणि सहकार्याने नवीन उंची गाठतील’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
Heartiest congratulations @KamalaHarris! Your success is pathbreaking, and a matter of immense pride not just for your chittis, but also for all Indian-Americans. I am confident that the vibrant India-US ties will get even stronger with your support and leadership.
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.