मुंबई | पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीआधी कडवी झुंज होईल अशी अपेक्षा असताना तृणमूल काँग्रेसने मात्र सहजपणे बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपा मात्र शंभरी ओलांडण्यातही यशस्वी झालेली नाही. दरम्यान पश्चिम बंगालमधील विजयानंतर देशभरातून ममता बॅनर्जी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. पश्चिम बंगालच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ममता बॅनर्जींचे अभिनंदन, केंद्राकडून राज्याला नेहमी पाठिंबा राहील अशी ग्वाही देखील दिली आहे.
Congratulations to Mamata Didi for @AITCofficial's win in West Bengal. The Centre will continue to extend all possible support to the West Bengal Government to fulfil people’s aspirations and also to overcome the COVID-19 pandemic. @MamataOfficial
— Narendra Modi (@narendramodi) May 2, 2021
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.