नवी दिल्ली | दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीच्या शर्यतीत भाजप, आप आणि कॉंग्रेसमध्ये चुरस होती. मात्र, आपने ६३ जागांवर विजयी मुसंडी मारत एकहाती सत्ता मिळवली आहे.तर भाजपला ७ जागा मिळाल्या असून त्यांचा दारुन पराभव झाला आहे. शिवाय आश्चर्याची बाब म्हणजे ज्या दिल्लीत गेली १५ वर्षे शिला दिक्षितांचे राज्य होते तिथे कॉंग्रेसला एकही खाते उघडता आले नाही. पण हार पत्करुनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पार्टीचे आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले आहे.
Congratulations to AAP and Shri @ArvindKejriwal Ji for the victory in the Delhi Assembly Elections. Wishing them the very best in fulfilling the aspirations of the people of Delhi.
— Narendra Modi (@narendramodi) February 11, 2020
आम आदमी पार्टीने आणि अरविंद केजरीवालांनी आत्तापर्यंत दिल्लीकरांच्या सगळ्या मागण्या आप सरकारने पुर्णत्वास नेल्या आणि विकासाच्या मार्गावर दिल्लीकरांना आणले. अरविंद केजरीवाल यांची मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची ही तिसरी वेळ आहे आणि यापुढेही आप नक्कीच दिल्लीकरांसाठी काम करेल यात शंकाच नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.