नवी दिल्ली | देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे या परिस्थितीला आळा घालण्यासाठी आता केंद्रीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (२० एप्रिल) देशातील लस उत्पादकांसोबत चर्चा करणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाचीही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी एखादा महत्त्वाचा निर्णय घेतात का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशव्यापी लॉकडाऊनची शक्यता नाकारली असली तरी केंद्र सरकार त्या दिशेने पावले टाकायला सुरुवात करु शकते. तसेच, काल १८ वर्षांवरील सगळ्यांना लस देण्याचा निर्णय देखिल घेण्यात आला आहे.
#WATCH | Delhi: A huge rush of migrant workers at Anand Vihar Bus Terminal.
Delhi Govt has imposed a 6-day lockdown beginning at 10 pm tonight. pic.twitter.com/LDFesCKiKQ
— ANI (@ANI) April 19, 2021
देशाच्या राजधानीमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. नवी दिल्लीतील आरोग्य यंत्रणा कोलमडली नाही मात्र, आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेएवढे रुग्ण आढळत आहेत. या परिस्थितीमुळं नवी दिल्लीमध्ये पुढील आठवडाभर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.