नवी दिल्ली | लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाल्यानंतर आज (१० फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांवर नरेंद्र मोदी बोलताना विरोधकांनी मोठा गदारोळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र कृषी कायदा लागू झाल्यानंतर एमएसपीची खरेदी आणखी वाढली असल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला. माझ्या भाषणांमध्ये अडथळे निर्माण करणे हे एक सुनियोजित षडयंत्र असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच काँग्रेसवाल्यांनी कृषी कायद्याच्या कलरपेक्षा कन्टेन्टवर चर्चा करणं जास्त गरजेचं होतं, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
Farm laws were passed through an Ordinance & later by Parliament. No mandis were shut after the implementation of these laws, MSP did not end anywhere in the nation. It's a truth which we hide, it has no meaning. Purchase on MSP increased after the laws were formed: PM Modi in LS pic.twitter.com/WcNJwWznYY
— ANI (@ANI) February 10, 2021
नरेंद्र मोदी म्हणाले की, कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हा हेतू आहे. कृषी कायदा लागू झाल्यानंतर बाजारपेठा, एमएसपी बंद झाली नाही. उलट एमएसपीची खरेदी आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र कृषी कायद्याबाबत खोटं पसरवलं जात आहे. यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांपर्यंत याबाबत सत्य पोहचलं तर भांडाफोड होईल. त्यामुळे गोंधळ घातला जात आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच अशाने तुम्ही लोकांचा विश्वास जिंकू शकणार नाही, असंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
Three farm laws were brought in by Government, these Agricultural reforms are important & necessary. Congress MPs in House debated on colour of the laws (black/white), it would have been better if they had debated on the content and intent of the laws: PM Modi pic.twitter.com/BKs1IrcjQz
— ANI (@ANI) February 10, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.