HW News Marathi
Covid-19

कुंभमेळ्यातील वाढत्या कोरोनाची मोदींनी घेतली दखल, कुंभमेळा प्रतिकात्मक करण्याचे केले आवाहन

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्ण संख्या एका दिवसाला २ लाखांच्या पुढे आढळण्यास सुरुवात झाली आहे. कुंभमेळ्याच्या अनेक रुग्ण सापडल्याने चित्ता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटात होत असलेल्या कुंभ मेळ्यावर मोठं भाष्य केलं आहे. कोरोना संकटामुळे आता कुंभमेळा प्रतिकात्मक करा असं आवाहन मोदींनी केलं. पंतप्रधान मोदींनी जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांना हे आवाहन केलं.

हरिद्वारमधील कुंभ मेळ्यात शेकडो साधू-संतांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यावरुन आता पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन, साधूंना आवाहन केलं. मोदी म्हणाले, “आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरुन बोलणं झालं. सर्व संतांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सर्व संत प्रशासनाला सहकार्य करत आहेत. त्यासाठी मी संत जगताचं आभार व्यक्त केलं.
हरिद्वारमधील कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून, अनेक साधू आणि भाविकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कुंभमेळ्यात करोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुना आखाडाचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याकडे कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याचं आवाहन केलं आहे.

मोदी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. “आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी आज फोनवरून संवाद साधला. सर्व संतांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करत आहेत. याबद्दल मी संतांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर मी विनंती केली की, दोन शाही स्नान झाले आहेत आणि करोनाच्या संकटामुळे कुंभमेळा आता प्रतिकात्मक पद्धतीने व्हावा. यामुळे संकटाशी लढण्याला ताकद मिळेल,” असं आवाहन मोदींनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लंडनहून १० जण रत्नागिरीत, कोकणाची चिंता वाढली!

News Desk

आमदारांचा निधी २ कोटीने कमी करा आणि तो कामगारांना द्या,चंद्रकात पाटलांची सरकारकडे मागणी!

News Desk

अमित ठाकरेंनी घेतली राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची भेट

News Desk