नवी दिल्ली | गेल्या २ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटून गेला तरी केंद्राच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदलन करत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (८ फेब्रुवारी) पहिल्यांदाच संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपलं मौन सोडलं. शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या योजना आणि कायद्याचं महत्त्व त्यांनी संसदेत अधोरेखित करतानाच विरोधकांवरही टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कृषी सुधारणांच्या बाजूने आहेत. काँग्रेससह अनेकांनी कृषी सुधारणांची वकिलीही केली. पण काहींनी राजकारणासाठी या कायद्यावरून यूटर्न घेतला, अशी अप्रत्यक्ष टीका नरेंद्र मोदी यांनी पवारांवर केली.
नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत कृषी कायद्यावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडले. आमचे आदरणीय शरद पवारजी यांनी कृषी सुधारणांची वकिली केली. शरद पवारांनी आताच सांगितलं मी कृषी सुधारणांच्या बाजूने आहेत. काँग्रेससह अनेक नेत्यांनीही कृषी सुधारणांच्या बाजूने असल्याचं सांगितलं. आता अचानक काही लोकांनी राजकारणासाठी यूटर्न घेतला. त्यासाठीच त्यांनी त्यांचे विचार मांडले, अशी अप्रत्यक्ष टीका मोदींनी पवारांवर केली.
Sharad Pawar ji, and those from Congress, everyone… all governments have stood for agricultural reforms. Whether they were able to do it or not, but everyone has advocated that it should be done: PM Narendra Modi in Rajya Sabha pic.twitter.com/KzVsYultim
— ANI (@ANI) February 8, 2021
कृषी कायद्याबाबत माझं म्हणणं ऐकू नका, पण किमान मनमोहन सिंग यांचं तरी म्हणणं ऐका. मनमोहन सिंग यांनी जे सांगितलं. तेच मोदी करत आहे, याचा अभिमान तर बाळगा, असं टोलाही त्यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणांचा उल्लेख केला. छोट्या शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आणली, आम्ही पहिल्यांदाच किसान रेल्वे आणली. याचा फायदा छोट्या शेतकऱ्यांनाच होत आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
श्रेय तुम्ही घ्या, शिव्या माझ्या खात्यात जमा करा
आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहोत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. कोणताही तणाव नाही. फक्त शेतकऱ्यांनी बुजुर्गांना घरी पाठवलं पाहिजे, असं सांगतानाच आता शेतीत मोठी सुधारणा झाली पाहिजे. आज जे मी केलं, ते उद्या कुणाला तरी करावंच लागलं असतं. हवं तर तुम्ही त्याचं श्रेय घ्या. शिव्या माझ्या खात्यात येऊ द्या, पण नव निर्माण करण्यासाठी आपण काही केलं पाहिजे, त्यासाठी पुढे या असं आवाहनही त्यांनी केलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.