HW News Marathi
देश / विदेश

कोरोनापासून वाचण्यासाठी पंतप्रधान करणार जनआंदोलन!

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कोरोना विरोधात जनआंदोलन छेडणार आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी पंतप्रधानांकडून शपथ दिली जाणार आहे. देशात ६७ लाखाहून अधिक जण कोरोना वायरसच्या संपर्कात आले आहेत. पण यातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.हिवाळा आणि त्यात आलेल्या सणांमध्ये कोरोना वेग वाढू नये यासाठी पंतप्रधान जनतेला आवाहन करणार आहे. मास्क वापरणे, दोन फुटांचे अंतर आणि सतत हात धुवण्याचा संदेश पंतप्रधान देणार आहेत.

कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ८५.०२ टक्क्यांवर पोहोचलीय. पंतप्रधानांच्या नव्या मोहिमेतून १३५ कोटी भारतीयांना कोरोना विरोधात लढण्याची शपथ दिली जाईल. देशवासिय कोरोनापासून स्वत: आणि कुटुंबाचा बचाव करण्याची शपथ घेतील.

WHO ने दिलेल्या माहितीनुसार, ९ कोरोना व्हॅक्सीन पाइपलाइनमध्ये आहे. त्यामुळे लस बाजारात आल्यावर त्याचं समान वाटप होणं हे आव्हान आपल्यासमोर आहे. आतापर्यंत १६८ देश या कोवॅक्स फॅसिलिटीत सहभागी झाले आहेत. फक्त चीन, अमेरिका आणि रशिया या देशांचा यामध्ये समावेश नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्याजदर कायम, रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर – शक्तिकांता दास

News Desk

“नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात उद्या अंतिम निर्णय”, अजित पवारांची माहिती

Aprna

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, अनेक वस्तूंवरील जीएसटीत घट

News Desk