HW News Marathi
Covid-19

पंतप्रधान जगातील १०० देशांच्या राजदुतांसह पुण्याच्या सीरम इन्स्टीट्युटला भेट देणार

पुणे | कोरोनावरील लस कधी येणार या प्रतीक्षेत सगळेच जण आहेत. दरम्यान, कोरोनावरील लस पुण्याच्या सीरम कंपनीत तयार होत असल्याने याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या संदर्भातील आढावा घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगातील शंभर देशाचे राजदूत पुण्यातील सीरम इन्स्टीट्युटला   भेट देणार आहेत. याबाबत प्रशासनामध्ये हालचाली सुरु झालेल्या आहेत. राजदूतांच्या दौर्‍याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच बैठक घेतली आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. २७ नोव्हेंबरला राजदूत सीरमला भेट देणार आहेत. २८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.  याबाबत प्रशासनाने तयारी सुरु केलेली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना व्हायरसवरील लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे.

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना या भेटीची माहिती देत तिचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी राव यांच्यासह पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याशी चर्चा करून ‘मिनिट टू मिनिट टू’ कार्यक्रम निश्चित केला आहे. दिल्ली येथून विमानाने 98 देशांचे राजदूत लोहगाव विमानतळाच्या टेक्निकल एरिया येथे दाखल होणार आहेत. तर, रशिया आणि सौदी अरेबियाचे राजदूत मुंबईहून पुण्यात येणार आहेत.

करोनाच्या लशीचा सद्यस्थितीची आढावा घेण्यासाठी १०० देशांचे राजदूत येत्या शुक्रवारी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. दिल्ली येथून 98 तर मुंबईहून दोघे राजदूत पुण्यात दाखल होणार आहेत. या १०० राजदूत दोन गटांमध्ये ‘सिरम इन्स्टिट्यूट’ तसेच हिंजवडी येथील ‘जिनोव्हा बायो-फॉर्मासिटिक्युअल्स’ला भेट देणार आहेत. अ‍ॅस्ट्राझेनका कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही लस ९० टक्के परिणामकारक असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर या १०० देशांच्या राजदुतांची पुणे भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात पुन्हा पुर्ण लॉकडाऊन होणार? अमित शहा म्हणतात…

News Desk

एसटी महामंडळाने लॉकडाऊनमुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ!

News Desk

घरी परतणाऱ्या मजूर, कामगारांकडून मानवतेच्या दृष्टीने रेल्वेने तिकीट न आकारण्याची विनंती

News Desk