नवी दिल्ली । चित्रपट सृष्टीतील अत्यंत मानाचा समजला जाणार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आज दिल्लीत वितरण होणार आहे. ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत अंधाधुन सर्वोत्कृष्ठ सिनेमा तर आयुष्मान आणि विकी कौशल सर्वोत्कृष्ठ अभिनेता पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘पॅडमॅन’ हा अक्षय कुमार स्टारर चित्रपट सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ या चित्रपटाला दोन पुरस्कार जाहीर झाले होते. सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार श्रीनिवास पोकळेला तर पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्काराने सुधाकर रेड्डी यांचा गौरव.
Best Actor (Feature Films Section) goes to @vickykaushal09 for #URI: The Surgical Strike for effectively conveying a realistic character of an army officer. #NationalFilmAwards pic.twitter.com/J39YnXGugd
— PIB India (@PIB_India) December 23, 2019
अमिताभ बच्चन यांना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले जाणार होते. दादासाहेब फाळके पुरस्कार हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च सरकारी सन्मान आहे. सुवर्णकमळ, शाल आणि दहा लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
T 3584/5/6 –
Down with fever .. ! Not allowed to travel .. will not be able to attend National Award tomorrow in Delhi .. so unfortunate .. my regrets ..— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 22, 2019
अमिताभ बच्चन यांना तापा असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना प्रवास करण्यास मनाई केली असून आराम करण्याचा सल्ला दिला आहे. यासंबंधीचे ट्वीट बिग बींनी रविवारी (२२ डिसेंबर) संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी केले आहे. त्यानंतर अमिताभ बच्चन आजारी असल्याची बातमी सोशल मीडियावर पसरताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांची तब्येत लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना सुरू केली. अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत म्हटले की, “ताप आला आहे… प्रवास करण्याची परवानगी नाही. दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सहभागी होऊ शकत नाही… अत्यंत दुर्दैवी आहे… मला याचे दु:ख होत आहे”!
.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – भोंगा
- सर्वोत्कृष्ट राजस्थानी चित्रपट – टर्टल
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- अंधाधुन
- सर्वोत्कृष्ट उर्दू चित्रपट- हमीद
- सर्वोत्कृष्ट तेलगू चित्रपट- महान्ती
- सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट- बिलबुल कॅन सिंग
- सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट- हारजीता
- सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट – रेवा
- सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट- केजीएफ -विक्रम मोर
- सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या व ज्योती तोमर (पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी)
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी (पद्मावत)
- सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर- उरी
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कीर्ति सुरेश (महानती, तेलुगू)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधून)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता – विकी कौशल (उरी)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी) (सुवर्ण कमळ) पर्यावरण संवर्धनावरील
- सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी सामाजिक विषयावरील
- सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅनसर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.