HW News Marathi
देश / विदेश

नौदलाच्या पश्चिम विभागाचा नौदल अलंकरण समारंभ – 2022 मुंबईत संपन्न

मुंबई | नौदलाच्या पश्चिम विभागाचा (डब्लूएनसी) नौदल अलंकरण समारंभ – २०२२ मुंबईत ८ फेब्रुवारी २०२२ रोजी संपन्न झाला. यावेळी व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, प्रमुख ध्वजाधिकारी (फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ), पश्चिम नौदल विभाग यांनी स्वातंत्र्य दिन २०२० आणि प्रजासत्ताक दिन २०२१ रोजी जाहीर केलेले शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कार विजेत्यांना प्रदान केले.

या समारंभादरम्यान कमांडर धनुष मेनन आणि हरिदास कुंडू एमसीए (एफडी) द्वितीय यांना नौ सेना पदक (शौर्य) प्रदान करण्यात आले. तर कमांडर अनिल मर्या यांना नौ सेना पदक (कर्तव्य निष्ठा) प्रदान करण्यात आले. आरएडीएम संदीप मेहता, एसयुआरजी आरएडीएम आरती सरीन, कमांडर श्रीकांत केसनूर, कॅप्टन बिरेंद्र सिंग बैंस, कॅप्टन सुमित सिंग सोधी, कॅप्टन कपिल भाटिया आणि जय सिंग, एमसीपीओ I (जीडब्लू)/ मानद सब लेफ्टनंट यांना विशिष्ट सेवा पदक (व्हीएसएम) प्रदान करण्यात आले.

कमांडर-इन-चीफ यांनी गेल्या काही वर्षात सेवा आणि प्रदर्शनात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या आयएनएस गोमती आणि खानपानाची व्यवस्था करणाऱ्या बेस व्हिक्युलिंग यार्ड (मुंबई) यांना युनिट सायटेशन प्रदान केले. कर्तव्य बजावताना सेवा कर्मचार्‍यांना अखंड पाठिंबा दिल्याबद्दल पुरस्कार विजेत्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या योगदानाची त्यांनी प्रसंशा केली.

दरम्यान, कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर मानवंदना सोहळा सर्व विजेत्यांसाठी एकाच ठिकाणी कमांड परिसरातच आयोजित केला होता. या समारंभाला भारतीय नौदलातील अनेक ज्येष्ठ मान्यवर तसेच पुरस्कार विजेत्यांचे जीवनसाथी आणि कुटुंबीय उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळमधील महापुरात आतापर्यंत ३८५ जणांचा मृत्यू

swarit

#AyodhyaRamMandir : …अन् पंकजा मुंडेंनी चित्र रेखाटत श्रीरामाला केले कलात्मक नमन !

Gauri Tilekar

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

News Desk