HW Marathi
देश / विदेश राजकारण

खासदारांचे वेतन घ्या पण खासदार निधी कापू नका, नवनीत राणांची मागणी

नवी दिल्ली | खासदारांचे वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका, अशी विनंती अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनानिमित्त  दिल्लीत नवनीत राणा यांनी लोकसभेत बोलताना ही मागणी केली आहे. “कृपया आमचे (खासदारांचे) पगार घ्या, पण कृपा करुन मतदारसंघाच्या विकासासाठी दिला जाणाऱ्या निधीत कपात करु नका” अशी विनंती नवनीत कौर राणा यांनी केली आहे.

लोकसभेने संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन (दुरुस्ती) विधेयक २०२० मंजूर केले आहे. यावरील चर्चेदरम्यान नवनीत राणा यांनी मागणी केली आहे. यानुसार खासदारांचे ३० टक्के वेतन पुढील वर्षभरासाठी कापले जाणार आहे. त्यामुळे आता यांची मागणी पूर्ण होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Related posts

‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात!

News Desk

ब्रिटनच्या राजपुत्र प्रिन्स हॅरीचा शाही विवाह सोहळा

News Desk

तीन वर्षात महाराष्ट्रात स्त्रीभ्रृण हत्येचं प्रमाण वाढले- सुप्रिया सुळे

Ramdas Pandewad