नवी दिल्ली | खासदारांचे वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका, अशी विनंती अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनानिमित्त दिल्लीत नवनीत राणा यांनी लोकसभेत बोलताना ही मागणी केली आहे. “कृपया आमचे (खासदारांचे) पगार घ्या, पण कृपा करुन मतदारसंघाच्या विकासासाठी दिला जाणाऱ्या निधीत कपात करु नका” अशी विनंती नवनीत कौर राणा यांनी केली आहे.
Please take our (MPs) salaries, but please do not cut MPLADS funds (Members of Parliament Local Area Development) meant for development works: Navneet Ravi Rana, Independent MP from Amravati, Maharashtra, in Lok Sabha
(file pic) pic.twitter.com/IOV7WlSSGG— ANI (@ANI) September 15, 2020
लोकसभेने संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन (दुरुस्ती) विधेयक २०२० मंजूर केले आहे. यावरील चर्चेदरम्यान नवनीत राणा यांनी मागणी केली आहे. यानुसार खासदारांचे ३० टक्के वेतन पुढील वर्षभरासाठी कापले जाणार आहे. त्यामुळे आता यांची मागणी पूर्ण होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.