मुंबई। देशाच्या सीमेवर कोणतीही घुसखोरी झालेली नाही, असा दाव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. भारत हा शांतिप्रिय देश आहे. मात्र, देशाकडे वाकड्या नजरेने पाहाणा-यांला भारतीय सैनिकांनी धडा शिकविला आहे, असे संकेत मोदींनी त्यांच्या संशोधनातून चीनला दिले आहे. मोदी पुढे म्हणाले, भारताकजे कोणी वाकडी नजरेने पाहिले तर सैन्याला योग्य ती कारवाई करण्याची मुभा देण्यात आली आहे, असे म्हणत चीनला धमकी वजा इशारा दिला आहे.
#WATCH Neither have they intruded into our border, nor has any post been taken over by them (China). 20 of our jawans were martyred, but those who dared Bharat Mata, they were taught a lesson: PM Narendra Modi at all-party meet on India-China border issue pic.twitter.com/tWojnnrLOY
— ANI (@ANI) June 19, 2020
आज आपल्या देशाची अशी क्षमता आहे कोणीही देशाच्या एक इंच जमिनीकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही, असा इशारा मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत आज (१९ जून)चीनला दिला आहे. सध्या एलएसी भागात भारतीय सैन्याने पेट्रोलिंग वाढवली आहे. भारत कोणाच्याही दबावाखाली येणार नाही. देशाच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहोत. सीमेवर चीनकडून एलएसीवर जे काही सुरु आहे त्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. हीच भावना सर्वपक्षीय बैठकीत आपल्या चर्चेदरम्यान पाहायला मिळाली, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.