HW News Marathi
Covid-19

नेपाळ सरकारनेही १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा घेतला निर्णय

मुंबई | नेपाळ सरकारनेही १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार, नेपाळमध्ये आतापर्यंत ८२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. लॉकडाऊनमुळे नेपाळचे रस्ते ओस पडले आहे. ब्रिटनहून नेपाळला आलेल्या एका महिलेला पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला होता. भारताने नेपाळला २३ टन औषधांचा पुरवठा केला आहे.

दरम्यान, भारतात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा देशभरात लॉकडाऊन वाढवला आहे. केंद्र सरकारने २५ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषला केली. या २१ दिवसांच्या लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार होता. मात्र, तरी देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम असल्याचे पाहून हा लॉकडाऊन पुन्हा १९ दिवसांसाठी वाढवण्यात आला. या लॉकडाऊनचा कालावधी ३ मे रोजी संपणार होता. मात्र, पुन्हा दोन आठवड्यांसाठी हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन ४ मे पासून १७ मेपर्यंत राहणार आहे.

तेलंगणा राज्यात २९ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यातील लॉकडाऊन २९ मेपर्यंत वाढवला आहे. सध्या तेलंगणा राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १ हजारांच्या पुढे आहे. तर देशात कोरोनाबाधितांचा आकडा हा ४८ हजारांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, देशात जरी लॉकडाऊन १७ मेपर्यंत असला तरी तेलंगणातील लॉकडाऊन हा २९ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSC परिक्षा कधी होणार ? मुख्यमंत्री कार्यालयाने दिली माहिती

News Desk

काही लोकांना हौस असते आंदोलन करण्याची ! अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

News Desk

#Lockdown5 : कंटेन्मेंट झोनमध्ये सर्व बंद, तर केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने सूट देणार

News Desk