वडोदरा | देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यात शून्य ते १० वर्षे वयाच्या २०,१७१ मुलांना, तर ११ ते २० वर्षे वयोगटातील ५३,३६५ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच, गुजरातच्या वडोदरा येथे जन्मजात जुळ्या बाळांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एसएसजी रुग्णालयातील पीडियाट्रीक विभागाच्या प्रमुखांनी यांसदर्भात माहिती दिली.या बाळांचा जन्म झाल्यानंतर १५ दिवसांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्यापही त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती उत्तम असल्याचंही डॉ. अय्यर यांनी सांगितलं आहे.
Gujarat: Newborn twins tested positive for #COVID19 in Vadodara
"Twins were brought in 15 days after being born with severe diarrhoea & dehydration. They tested positive but are better now. Haven't been discharged yet," said Dr Iyer, Head Dept of Pediatrics, SSG Hospital (01.04) pic.twitter.com/vvg1Mzl6U7
— ANI (@ANI) April 2, 2021
महाराष्ट्रात ० ते २० वर्षे वयातील ७३,५३६ मुले तीन महिन्यात बाधित झाली आहेत. कोरोनाचा सर्वात जास्त फटका ३१ ते ४० वर्षे वयोगटातील तरुणांना बसला आहे. या वयोगटातील १,७७,७६९ जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. गुजरातध्ये जन्मजात जुळ्या बाळांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात माहिती देताना डॉ. अय्यर म्हणाल्या की, या लहान बाळांमध्ये दस्त आणि पाण्याच कमतरता असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी, दोन्ही बाळांच कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये, दोघांचाही अहवाल पॉझिटीव्ह आढळून आला आहे.
कोरोनाची दुसरी लाट मुलांसाठी धोकादायक
कोरोनाची नव्याने आलेली लाट ही नव्या स्ट्रेनमुळे आल्याचे दावे केले जातायत. कारण या नव्या कोरोनामध्ये जुन्या कोरोनाच्या लक्षणांसोबतच काही नवीन लक्षणं सुद्धा दिसून येतायत. ताप, थकवा, अशक्तपणा, खोकला या जुन्या लक्षणांसोबतच अतिसार किंवा जुलाब, उलट्यासद्धा या नव्या कोरोनाची नवी लक्षणं आहेत. हीच लक्षणं लहान मुलांसाठी घातक ठरतायत. यापूर्वीही लहान मुलांना कोरोनाची लागण होत होती, मात्र लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार करण्याची क्षमता मोठ्यांपेक्षा असल्यामुळे ती लवकर बरी व्हायची. मात्र नव्या कोरोनाची जुलाब, उलट्या अशा प्रकारची लक्षणं ही लहान मुलासांठी धोकादायक असू शकतात असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे दरम्यान, मार्च महिन्यात महाराष्ट्रात ५५ हजारांपेक्षा जास्त लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.