HW News Marathi
देश / विदेश

मालदीवचे नवे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह

मालदीव | मालदिवियन डेमोक्रेटिक पार्टीचे इब्राहिम मोहम्मद सोलिह मालदीवमधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. सध्याचे राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना त्यांनी पराभूत केले आहे. मुख्य म्हणजे इब्राहिम सोलिह हे भारत समर्थक आहेत तर अब्दुल्ला यामीन हे चीनच्या बाजूने होते.

सोलिह याना राष्ट्रपतीपद मिळणार असल्याने भारत आणि मालदीव यांच्यामधील द्विपक्षीय संबंध सुधारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोलिह यांचा विजय झाल्यानंतर सर्वप्रथम भारताने त्यांना शुभेच्छा दिल्या. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सोलिह यांना ५८.३ टक्के मते मिळाली. तर यामीन यांना ४१.७ टक्के मते मिळाली.

यामीन नोव्हेंबर २०१३ मध्ये राष्ट्रपती बनले होते. त्यांच्या काळात राजकीय पक्ष, न्यायालये आणि मीडिया यांच्यावर कारवाई झाली होती. यासीन यांच्या विरोधात महाभियोग आणण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या खासदारांवर कारवाई करण्यात आली होती. मालदीवमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारला राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. हा आदेश राष्ट्रपती यामीन यांनी न मानता देशात १५ दिवस आणीबाणी लागू केली होती. यामुळे मालदीवमध्ये राजकीय संकट निर्माण झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रगीताचा अनादर केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी यांना मुंबई न्यायालयाचे समन्स

News Desk

अॅम्बी व्हॅलीवर बोली लावण्यास सुरुवा

News Desk

जैन मुनी शांतिसागर यांना बलात्कार प्रकरणी अटक

News Desk