HW Marathi
देश / विदेश

न्यूझीलंडमधील मशिदीत झालेल्या अंदाधुंद गोळीबारात ४९ जणांचा मृत्यू

वेलिंग्टन | न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च परिसरात दोन मशिदींमध्ये अज्ञाताने अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारीत ४९ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू अल नूर मशिदीत जात असताना ही गोळीबाराची घटना घडली. परंतु, सुदैवाने क्रिकेट संघातील खेळाडू सुखरूप बाहेर पडून बचावले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर आयईडी स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली आहे. ती पोलिसांनी निकामी केली आहे.

न्यूझीलंडमधील हा काळा दिवस आहे, असे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जैसिंडा अर्डर्न यांनी म्हटले आहे. या हल्ला ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेल्या अतिरेक्यांनी घडवून आणला आहे, अशी माहिती खुद्द ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिली आहे. चार हल्लेखोरांपैकी स्कॉट मॉरिसन हा ऑस्ट्रेलियाचा नागरिक असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिली आहे. या हल्ल्याच निषेध करत राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच अनेक ऑस्ट्रेलियातील अनेक सरकारी कार्यालयातील राष्ट्रीय ध्वज अर्धावर उतरवला आहे.

गोळीबार झाली त्यावेळी बांगलादेशची क्रिकेट टीम मशिदीमध्येच उपस्थित होती. सुदैवाने बांगलादेशच्या सर्व खेळाडूंना आणि इतर उपस्थितांसह सुखरुप मशिदीबाहेर आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील उद्या (१६ मार्च) पासून सुरू होणारी कसोटी मालिका रद्द करण्यात आली आहे.

 

Related posts

तेलुगू देसम पक्षाचे नेते नंदामुरी हरिकृष्णा यांचा भीषण अपघातात मृत्यू

News Desk

उपाचारासाठी ५० रुपये कमी पडल्याने बाळाचा मृत्यू

News Desk

नीरव मोदी ब्रिटनमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिली माहिती

अपर्णा गोतपागर