वेलिंग्टन | न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च परिसरात दोन मशिदींमध्ये अज्ञाताने अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारीत ४९ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू अल नूर मशिदीत जात असताना ही गोळीबाराची घटना घडली. परंतु, सुदैवाने क्रिकेट संघातील खेळाडू सुखरूप बाहेर पडून बचावले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर आयईडी स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली आहे. ती पोलिसांनी निकामी केली आहे.
#UPDATE New Zealand Police Commissioner Mike Bush: 49 people have been killed in shooting at two mosques in Christchurch pic.twitter.com/7nKDYRp1vb
— ANI (@ANI) March 15, 2019
न्यूझीलंडमधील हा काळा दिवस आहे, असे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जैसिंडा अर्डर्न यांनी म्हटले आहे. या हल्ला ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेल्या अतिरेक्यांनी घडवून आणला आहे, अशी माहिती खुद्द ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिली आहे. चार हल्लेखोरांपैकी स्कॉट मॉरिसन हा ऑस्ट्रेलियाचा नागरिक असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिली आहे. या हल्ल्याच निषेध करत राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच अनेक ऑस्ट्रेलियातील अनेक सरकारी कार्यालयातील राष्ट्रीय ध्वज अर्धावर उतरवला आहे.
All members of the Bangladesh Cricket Team in Christchurch, are safely back in the hotel following the incident of shooting in the city.
The Bangladesh Cricket Board is in constant contact with the players and team management.#ChristchurchMosqueAttack pic.twitter.com/TTpIFxLp05
— Bangladesh Cricket (@BCBtigers) March 15, 2019
गोळीबार झाली त्यावेळी बांगलादेशची क्रिकेट टीम मशिदीमध्येच उपस्थित होती. सुदैवाने बांगलादेशच्या सर्व खेळाडूंना आणि इतर उपस्थितांसह सुखरुप मशिदीबाहेर आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील उद्या (१६ मार्च) पासून सुरू होणारी कसोटी मालिका रद्द करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.