HW Marathi
देश / विदेश

नीरव मोदी लंडनमध्ये, घोटाळ्याबाबतच्या प्रश्नांवर उत्तर देण्यास दिला स्पष्ट नकार

नवी दिल्ली | पीएनबी बँकेला करोडोंचा चुना लावून परदेशात पसार झालेला नीरव मोदी सध्या लंडनमध्ये राहत आहेत. ‘द टेलिग्राफ’ च्या एका पत्रकाराने नीरव मोदीला लंडनच्या रस्त्यावर फिरताना पाहिले. त्यानंतर या पत्रकाने नीरव मोदीला घोटाळ्यासंबंधीचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मात्र, त्याच्या कोणत्याही प्रश्नास उत्तर देण्यात नीरव मोदीने नकार दिला. या पत्रकाराने अनेकदा नीरव मोदीला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला मात्र ‘सॉरी नो कॉमेंट्स’ असे म्हणत नीरव मोदीने उत्तरे देण्यास टाळले.

फरार नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीने पीएनबी बँकेला तब्बल १३,००० कोटी रुपयांचा चुना लावला आहे. नीरव मोदीचा अलिबाग तालुक्यातील कोळगाव समुद्र किनारी असलेला अलिशान बंगला काल (८ मार्च) सकाळी ९ वाजातच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आला. नीरव मोदीचा हा बंगला पाडण्यासाठी १०० डायनामाइट्स वापरण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात २५ जानेवारीला झालेल्या सुनावणीदरम्यान रायगडचे जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले कि, नीरव मोदीचा बंगला मजबूत असून तो उद्ध्वस्त करणे शक्य नाही. त्यामुळे डायनामाइट्सच्या साहाय्याने स्फोट घडवून हा बंगला जमीनदोस्त करण्यात आला.

Related posts

गुजरातच्या गीर जंगलात ११ दिवसांत ११ सिंहांचा मृत्यू

Gauri Tilekar

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची लिफ्ट अवघ्या १५ दिवसात बंद

News Desk

मोदींना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी

अपर्णा गोतपागर