HW News Marathi
देश / विदेश

#NirbhayaCase: दोषी विनय शर्माची याचिका न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली । निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्ररणातील चार दोषींपैकी एक विनय कुमार शर्मा दिल्ली पटियाला हाऊत न्यायालयाने फेटाळून लावली. विनय कुमार मानसिकरित्या आजारी असून त्याला उपचाराची गरज आहे, असा दावा दोषी विनय शर्माने त्यांच्या याचिकेत केला होता. मात्र, तिहार कारागृह प्रशासनाने दाखल केलेल्या पुराव्यांवरून विनय शर्माला कुठलाही मानसिक आजार नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याची दोषींची याचिका फेटाळून लावली.

न्यायालयाने सांगितले की, ‘मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यानंतर चिंता आणि डिप्रेशन सामान्य आहे. तसेच दोषीला योग्य उपचार आणि मानसोपचारतज्ज्ञांची मदत देण्यात आली आहे.’ विनय शर्माच्या अर्जावरील पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणी झाली. अलीकडेच विनय आपल्या आईसोबत दोनवेळा फोनवर बोलला. तरीही तो लोकांची ओळख विसरू लागला आहे, असा दावा त्याचे वकील कसा करू शकतात, असा सवाल तिहार प्रशासनाने उपस्थित केला होता. विनयने रविवारी (१६ फेब्रुवारी) कारगृहाच्या भिंतीवर डोके आपटल्यामुळे झालेली दुखापत वगळता त्याला कुठलाही त्रास नाही, असेही तिहार प्रशासनाकडून न्यायालयाला सांगण्यात आले. एवढचे नाहीतर कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करण्यात आले.

तिहार प्रशासनाने विनयचे सर्व वैद्यकीय अहवाल सादर केले. त्याला जुना कुठलाही आजार नसल्याचेही सांगण्यात आले. ‘विनय मानसिक आजारी असेल तर त्याने आपल्या वकिलांशी फोनवर बोलून सगळी माहिती कशी दिली असती,’ असा सवालही तिहार कारागृहातील प्रशासनाने उपस्थित केला. यासंदर्भातील दोन्ही पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी विनयची याचिका फेटाळून लावली. येत्या ३ मार्चला सकाळी ६ वाजता मारेकऱ्यांना तिहार कारागृहात फाशी देण्यात येईल.

१६ डिसेंबरची ‘ती ‘ काळरात्र

१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. त्यावेळी त्यांनी तिला अत्यंत निर्घृणपणे मारहाणही केली होती. त्यामुळे निर्भया गंभीररित्या जखमी झाली होती. यानंतर आरोपींनी निर्भयाला रस्त्याकडेला फेकून दिले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. जखमी निर्भयावर आधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला सिंगापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सिंगापूरमध्ये उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

OBC आरक्षणासाठी भाजप आक्रमक ! राज्यभरात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात

News Desk

रियायन्स जिओमध्ये आणखी एका अमेरिकी कंपनीची गुंतवणूक

News Desk

मरीना बीचवरील अंत्यसंस्काराचा नेमका वाद काय ?

swarit