नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या कोरोनाच्या विशेष पॅकेजची माहिती देण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठीही महत्वाच्या घोषणा केल्या. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसच् नाव येताच निर्मला सीतारामन भडकल्या. “मी सोनिया गांधी यांना हात जोडून विनंती करते की त्यांनी आपण स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर जास्त जबाबदारीने बोलले आणि वागले पाहिजे”, असे यावेळी निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
मला विरोधी पक्षांना आवाहन करायचे आहे की, स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर आपण एकत्र काम केले पाहिजे. आम्ही सर्व राज्यांसोबत या मुद्द्यावर चर्चा करत असून लक्ष ठेवून आहोत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, करोनाच्या संकटाशी तोंड देत असलेल्या सर्वच राज्यांना केंद्राकडून सर्वोतोपरी मदत केली जात असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
I want to tell the Opposition party that on the issue to migrants we all must work together. We are working with all states on this issue. With folded hands, I ask Sonia Gandhi ji that we must speak & deal with our migrants more responsibly: FM Sitharaman pic.twitter.com/CHXLxWiqPO
— ANI (@ANI) May 17, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.