HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याचा अमेरिकाचा दावा भारताने फेटाळून लावला

नवी दिल्ली | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली आहे. या दोघांमध्ये काश्मीरच्या मुद्यावरून चर्चा झाली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे. ट्रम्पच्या या विधानावर आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून निघाले आहे.

“दोन आठवड्यांपूर्वीच नरेंद्र मोदींशी माझी चर्चा झाली. त्यांनी मला विचारे होते की ‘तुम्ही मध्यस्थ होणार का?’ मी विचारले, ‘कुठे?’ तर ते म्हणाले, ‘काश्मीर प्रश्नी’.””मी म्हणालो, जर माझी काही मदत होणार असेल तर मला नक्कीच आनंद होईल,” असा दावा ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

रविश कुमार म्हणतात की, ‘डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केलेले वक्तव्य पाहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या प्रश्नावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थी करण्याची विनंती कधीच केली नाही. भारत आणि पाकिस्तानमधल्या सर्व प्रलंबित विषयांवर फक्त द्विपक्षीय चर्चाच होईल. सीमेपारील दहशतवाद संपवल्याशिवाय या चर्चांना सुरुवात होणार नाही. दोन्ही देशांमधल्या सर्व विषयांवर तोडगा काढण्यासाठीच्या आवश्यक तरतुदी याआधीच शिमला करार आणि लाहोर करारात नमूद आहेत,” असेही रविश कुमार म्हणाले. इम्रान आणि ट्रम्प यांच्यासोबत पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे मंत्री शाह महमूद कुरेशी उपस्थित होते. इम्रान सध्या ३ दिवसाच्या दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारकडून कृषीसह लघु-मध्यम उद्योगांना दुसरे आर्थिक पॅकेज मिळू शकते ?

News Desk

प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा चित्ररथ सादर होणार

News Desk

Independence Day | स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलचे खास डुडल

News Desk