HW Marathi
देश / विदेश

आता अ‍ॅमेझोनही देणार यूपीआय सुविधा

मुंबई | अ‍ॅमेझोन ही ई-कॉमर्स कंपनी आता भारतात स्वत:ची यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) सुविधा सुरु केली आहे. अ‍ॅमेझोनने अ‍ॅक्सिस बँकेसह ही सुविधा सुरु केली आहे. पैशांचे व्यवहार करण्यासाठी ही अत्यंत सोयीची सुविधा लोकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. अ‍ॅमेझोनच्या या सुविधेमुळे पेटीएम आणि फोनपे या अप्सवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

अ‍ॅमेझॉन यूपीआय कसे वापराल ?

सर्वप्रथम तुमच्या बँक खात्याला यूपीआय अॅपसोबत लिंक करावे लागेल. त्यानंतर पेटीएम, फोनपे या अॅप्सप्रमाणे पैसे पाठवू शकता येऊन घेऊ शकता. विशेष म्हणजे यूपीआय सर्व्हिसमध्ये बँक खात्याचा क्रमांक आणि आयएफएससी कोडची गरज लागत नाही. व्हर्च्यूअल पेमेंट अ‍ॅड्रेसद्वारे तुम्ही पैसे पाठवू शकता.

Related posts

मृतांचा अकडा आता 70

News Desk

मशिदीसाठी हाफिज सईदची मदत, ३ जण एनआयएच्या ताब्यात

Gauri Tilekar

डोवाल यांनी काश्मीरमधील नागरिकांसोबत जेवण करत केली चर्चा

News Desk